चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिं. सा. उ. मं.)सामाजिक एकतेसाठी सन १९२० सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली.
(चिं. सा. उ. मं.) हे मंडळ लालबाग-परळ या भागातील (गिरणगावातील) पहिले मंडळ आहे. मंडळाचे स्वतःचे आरोग्य चिकित्सा केंद्र आहे, त्यामार्फत वर्षातून दोन वेळा खेडेगावांमध्ये मोफत औषध वाटप केले जाते, मंडळसंचालीतकिलबिल नर्सरी, चिंतामणी संगणक प्रशिक्षण केंद्र, मोफत वाचनालय व ग्रंथालय(२५ वर्षापासून व सर्वप्रथम या मंडळाचे) या ग्रंथालयामार्फत पदवी अभ्यास क्रमाची पुस्तके उपलब्ध आहेत तसेच मंडळाची अभ्यासिका आहे, १ली ते १०वी, १२वी , तसेच पदवी अभ्यास यातील प्रत्येक विषयातील व सरासरीत प्रथम येणाऱ्या विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ केला जातो, गणेशोत्सव व नवरात्री या काळात लहान वयोगटातील मुलांपासून ते गृहिणींपर्यंत या सर्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, अलीकडे पावर लिफ्टिंग महापौर चषक हि स्पर्धा श्रींच्या मंडपात यशस्वी रित्या पार पडली, नवरात्रीच्या दरम्यान अनेक मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाप्रकारेवैद्यकिय, शैक्षणिक, कला, क्रीडा, मनोरंजन या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे.