Tuesday, 6 September 2011

चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokliha Chintamani)
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंसामं.)सामाजिक एकतेसाठी सन १९२० सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली
(चिंसामं.) हे मंडळ लालबाग-परळ या भागातील (गिरणगावातीलपहिले मंडळ आहेमंडळाचे स्वतःचे आरोग्य चिकित्सा केंद्र आहेत्यामार्फत  वर्षातून दोन वेळा खेडेगावांमध्ये मोफत औषध वाटप केले जातेमंडळसंचालीतकिलबिल नर्सरीचिंतामणी संगणक प्रशिक्षण केंद्र, मोफत  वाचनालय  ग्रंथालय(२५ वर्षापासून  सर्वप्रथम या मंडळाचे) या ग्रंथालयामार्फत पदवी अभ्यास क्रमाची पुस्तके उपलब्ध आहेत तसेच मंडळाची अभ्यासिका आहे१ली ते १०वी१२वी , तसेच पदवी अभ्यास यातील प्रत्येक विषयातील  सरासरीत  प्रथम येणाऱ्या  विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ केला जातो,  गणेशोत्सव   नवरात्री या काळात लहान वयोगटातील मुलांपासून ते गृहिणींपर्यंत या सर्वांसाठी  विविध स्पर्धांचे आयोजन केले जातेअलीकडे पावर लिफ्टिंग महापौर चषक हि स्पर्धा श्रींच्या मंडपात यशस्वी रित्या पार पडलीनवरात्रीच्या दरम्यान अनेक मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जातेअशाप्रकारेवैद्यकियशैक्षणिककलाक्रीडामनोरंजन या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे.
            वर्षातून फक्त एकदाच वर्गणी काढून वरील कार्यक्रम पूर्ण करण्यात येतात. गणेश विसर्जन मिरवणूक D.J. किंवा सिनेमांच्या गाण्यांवर  करता फक्त आरतीच्या तालावर संपूर्ण मिरवणूक पार पडते. दर वर्षी शिस्तबद्ध मंडळ म्हणून काळाचौकी पोलीस ठाणे यांच्याकडून  गौरवण्यात येतेगणेशोत्सवाच्या काळात मंडळाचे सहाय्यक सदस्यकार्यकारणी सदस्य  सर्व पदाधिकारी २४ तास श्रीं च्या मंडपात आपली सेवा रुजू करतात.

2 comments:

  1. गणपती मानाचा चिंतामणी चिंचपोकळीचा

    ReplyDelete
  2. MumbaiCha Raja Chintamani Maza................
    nyc blog............../

    ReplyDelete